स्नायूंच्या वाढीसाठी 'हे' 5 शाकाहारी खाद्यपदार्थ आहेत फायदेशीर
आजकाल जसे काही जण वजन कमी करण्यासाठी धडपड करताना दिसतात तसेच काही जण वजन वाढावे यासाठी प्रयत्न करताना दिसतात. वजन वाढवण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तरच तुमचे वजन वाढू शकते किंवा मग तुमच्य शरीरातील स्नायूंची मजबूत वाढ होऊ शकते.
हाय कॅलरी फूड (High Calorie Food)
व्यायाम (Exercise)
प्रोग्रेस ट्रॅकिंग (Progress Tracking)
या वरील बाबींवर जर तुम्ही लक्ष केंद्रित केले आणि त्याप्रमाणे तुमचे रुटीन सुरु केले तर वजन वाढू शकते. शरीरातील स्नायूंची योग्य वाढ आणि त्यांना चांगली बळकटी मिळावी यासाठी शाकाहारी लोक जास्त प्रयत्न करताना दिसतात. कारण, शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये प्रथिनांची कमतरता आढळून येते आणि स्नायूंच्या वाढीसाठी उच्च क्षमतेच्या प्रथिनायुक्त पदार्थांची शरीराला आवशक्यता असत्ते.
वजन वाढवण्यासाठी, फक्त कमी बजेट असलेला शाकाहारी आहार प्लॅन असणे हे पुरेसे नाही. परंतु, यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता ते या वजन वाढवण्याच्या प्रवासत महत्वाचे असते.जोपर्यंत तुम्ही शरीराच्या गरजेनुसार योग्य रित्या स्नायूंची वाढ करणारे खाद्यपदार्थ खात नाही तोपर्यंत स्क्वॉट्स, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट देखील यावर काही करु शकणार नाही.जास्त प्रमाणात प्रथिने घेणे हे देखील धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुमच्या रोजच्या गरजेनुसार प्रथिने घ्या. आता स्नायूंची योग्य वाढ करणाऱ्या शाकाहारी खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊयात. (1.)
पनीर (स्नायूंची योग्य वाढ करण्याच्या दरम्यान शाकाहारी लोकांसाठी पनीरचे सेवन हे सर्वात जास्त प्रमाणात केले जाते. त्यात प्रथिनांचे चांगले प्रमाण आढळते, जे तुमच्या रोजच्या आहारातील गरज पूर्ण करु शकते. 100 ग्रॅम पनीरमधून शरीराला जवळपास 20 ग्रॅम प्रथिने मिळतात. जर तुम्ही तुमच्या आहारात 150 ग्रॅम पनीरचा समावेश केला तर तुम्हाला एका सर्व्हिंगमध्ये(एका वेळी ताटात घेताना) 30 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. 2. शेंगा (Beansविविध प्रकारच्या शेंगांमधून चांगली प्रथिने मिळतात, शाकाहारी लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. मांसाहारी पदार्थांनंतर विविध प्रकारच्या शेंगा या प्रथिनांचा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा स्त्रोत आहे. एक कप सोयाबीनमध्ये जवळपास 15 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामध्ये कमी चरबी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जरी त्यात पूर्ण प्रथिने नसतात, परंतु त्यात स्नायूंच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेले अमिनो अॅसिड असतात. प्रथिने आणि फायबरचे सेवन वाढवण्यासाठी, दिवसातून 1 कप शेंगांचा आहारात जरुर समावेश करा. 3. ग्रीक योगर्ट (Greek Yogurt)
ग्रीक योगर्टमध्ये नियमित दह्यापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त आढळते. त्यामध्ये आपल्या आतड्यांमध्ये असणाऱ्या चांगल्या जीवाणूंना वाढवणारे बूस्टिंग प्रोबायोटिक्स (Gut Bacteria Boosting Probiotics) देखील असतात. त्यामुळे, स्नायूंच्या वाढीसाठी याची खूप मदत होते. 100 ग्रॅम ग्रीक दह्यामध्ये जवळपास 10 ग्रॅम प्रथिने असतात. परंतु, हे लक्षात ठेवा की, फ्लेवर्ड दह्यामध्ये साखरही असते. त्यामुळे नेहमी साध्या दह्याचे सेवन करा.
4. ब्राऊन राईस (Brown rice)
एक कप शिजवलेल्या ब्राऊन राईसमध्ये (तांबड्या तांदळामध्ये) जवळपास 5 ग्रॅम प्रथिने असतात. यामध्ये ब्रांचेड-चेन अमिनो अॅसिडचे (branched-chain amino acids) प्रमाण जास्त असते, जे स्नायूंची वाढ करण्यामध्ये आणि स्नायू दुरूस्त करण्यात मदत करतात. 5. पांढरे हरभरे/ चणें (Chickpeas)पांढरे हरभरे वजन वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतात. पांढरे हरभरे तुम्ही ब्राऊन राईससोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. एका वाटी हरभऱ्यांमध्ये जवळपास 12 ग्रॅम फायबर आणि 45 ग्रॅम स्लो अॅक्टिंग कार्ब्स असतात.
यासोबतच, हरभरे हे प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत असल्याने, ते आपल्या दैनंदिन गरज देखील पूर्ण करू शकतात.
Please do not enter any spam link in comment box.